Prajakta Gavhane

Prajakta Gavhane's Lyrics

Kanherichya Phula / कण्हेरीच्या फुला

कण्हेरीच्या फुला,
तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!
माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!

कण्हेरीच्या फुला,
गावचा पाऊस भारी... बेभान गं सरी!
तडातडा गारा ...शमे तहान गं उरी...
लाड पाऊस करतो ...मला कुशीत गं घेतो !
तळं साचूनी गं वेडा...जागा नौकेला या देतो !

मला एकटा बघुनी...आज घरात गाठूनी,
माझ्या डोळयापरि टिपं, त्यानं छतात गाळूनी,
तुझा सांगावा दिला...तोही हळवा झाला...
ऊनचटक्याचा सोस... त्याच्या डोळयात वाचला!
कण्हेरीच्या फुला,
माझा पाऊस गं लळा! . तुझा पाऊसच झळा!!

गावचा पाऊस म्हणे रानीवनी जातो!
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो !
ताल पाऊस धरतो ...माझ्या कौलावरी गातो !
तुझ्या रंगात न्हाऊनी ...मनामनात नाचतो !!

तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप !
व्याप पावसाला किती! ...तुला नदीतीरी ताप !
तुझा नकार घेऊनी... तो गं वळवाचा आला...
अस्सा विरह सोसेना ... तो गं पुरा कोसळला !!
कण्हेरीच्या फुला,
माझा पाऊस गं भोळा ! ...तुझा पाऊस गं चाळा !!

नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!
माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!
कण्हेरीच्या फुला,
तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!
2 people liked this
Prajakta Gavhane
Prajakta Gavhane
December 24 2012 Permalink
Thanx Umesh! really Thanx!
Umesh Gawade
Umesh Gawade
December 24 2012 Permalink
You are welcome !!!

Additional Information

गीतकार : प्राजक्ता गव्हाणे , गायक: सुरेश वाडकर, संगीतकार : तेजस चव्हाण, गीत संग्रह//चित्रपट : कण्हेरीची फुले (२०१२) / Lyricist : Prajakta Gavhane, Singer : Suresh Wadkar, Music Director : Tejas Chavhan, Album/Movie : Kanherichi Phule (2012)

Prajakta Gavhane Lyrics Submitted By

Prajakta Gavhane

Prajakta Gavhane

December 24 2012

geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines