Prajakta Gavhane

Prajakta Gavhane's Lyrics

Hi Vaat Vanatun Jaate / ही वाट वनातून जाते

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

स्तब्ध शांतता असेल जेथे
भय कुणाचे नसेल तेथे
इहलोकीच्या सुखचैनीचा
मंद सुवास... मनमौजीचा
झिडकारूनी ते सर्व लयाचे,
आक्रंदण त्या क्रुध्द भयाचे ...
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

पाणंदीतला शीतल वारा
नसेल जेथे स्वार्थी कावा..
'मी' पणाला नसेल थारा
सत्य -शांतीचा असे पहारा !
शस्त्र दुधारी केवळ शब्द
नियती स्तब्ध स्थित प्रारब्ध !
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे ! 

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे ! 
Prajakta Gavhane liked this

Additional Information

गीतकार : शंकर जांभळकर, गायक: बेला शेंडे, संगीतकार : तेजस चव्हाण, गीत संग्रह/चित्रपट : कण्हेरीची फुले (२०१२) / Lyricist : Shankar Jambhalkar, Singer : Bela Shende, Music Director : Tejas Chavhan, Album/Movie : Kanherichi Phule (2012)

Share this song

Prajakta Gavhane Lyrics Submitted By

Prajakta Gavhane

Prajakta Gavhane

December 24 2012

geetmanjusha.com © 1999-2019 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines