नभ व्याकूळ राहीला, त्याला आसमंती आस किती साद घाली जीवा तव चातकाची कास कश्शा बेभान या दिशा, कस्सा बेभान हा वारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा... हाक पावसाची... बळी व्याकूळ व्याकूळ निळया सावल्या ढगांच्या... मनी पांगूळ पांगूळ रात ऊरासवे कुंद, तिज चांदणे कुंपण लाली दाटली गं नभी, रंगे विराणी कोंदण कश्शा बेभान या दिशा, कस्सा बेभान हा वारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा वाट परतीची... गायी चालल्या गं घरा सरी पावसाच्या आर्त... कशा आल्या गं गतीला गारा बरसल्या खाली, गंध दाटला मातीला झाला पावन हा देह फिटे वैशाख वणवा कश्शा बेभान या दिशा, कस्सा बेभान हा वारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा दाटे ढगांचा पसारा...
geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines