Prajakta Gavhane

Prajakta Gavhane's Lyrics

Mazya Manatala Gaav / माझ्या मनातला गावं

माझ्या मनातला गावं, सये वडाच्या वेशीत 
दोन्ही बाजूंनी डोंगर, घर झाडाच्या कुशीत 

आंब्या फणसाची झाडे, माझ्या घराचं कुंपण 
दारी अबोली शेवंती, ताटवा फुलला छान 
भाव भक्तीचे अंगण, मध्ये तुळशी वृंदावन
सदा सांजवेळी आम्ही तया करितो वंदन 

सान पणती तेवते, ठाव काळोखाचा घेते 
प्रेम आपुलकी नाते घराघरात नांदते 
सगे सोबती बैसोनि गूज प्रेमाचे गाते 
सये सांगू तुला कैसे, मन तेथेच रमते
Prajakta Gavhane liked this

Additional Information

गीतकार : शंकर जांभळकर , गायक : प्रसेनजीत कोसंबी, संगीतकार : तेजस चव्हाण, गीत संग्रह/चित्रपट : कण्हेरीची फुले (२०१२) / Lyricist : Shankar Jambhalkar, Singer : Prasenjeet Kosambi, Music Director : Tejas Chavhan, Album/Movie : Kanherichi Phule (2012)

Prajakta Gavhane Lyrics Submitted By

Prajakta Gavhane

Prajakta Gavhane

December 23 2012

geetmanjusha.com © 1999-2020 Manjusha Umesh | Privacy | Community Guidelines