Vadal vaar sutal g / वादळ वारं सुटलं गं
वादल वारं सुटल गं, वार्यानं तुफान उठलं गं भिरिभर वार्यांत, पावसाच्या मार्यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं वादल वारं सुटलं गं गडगड ढगांत बिजली करी फडफड शिडात, धडधड उरी एकली मी आज घरी बाय संगतीला माझ्या कुनी नाय सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत जागणार्या डोल्यांत सपान मिटलं सरसर चालली होडीची नाळ दूरवर उठली फेसाची माळ कमरेत जरा वाकूनिया पान्यामंदी जालं फेकूनिया नाखवा माझा, दर्याचा राजा लाखाचं धन यानं जाल्यांत लुटलं

Excellent कोळी गीत - it is one of the three beautiful songs written by Shanta Shelke and rendered by Lata Mangeshkar with the lilting music score by Hridayanath Mangeshkar.
You must be logged in to comment!